Tuesday, 21 April 2020

सन्माननीय सरकार मायबाप समाजामध्ये मातीला किंमत काहीच नसते परंतू कुंभार त्या मातीला आकार दिल्या नंतर त्याला किंमत मिळते परंतू त्या साठी कुंभाराला खूप कष्ट करावे लागतात. त्याच प्रमाणे विनाअनूदानीत उच्च माध्यमिक शिक्षक 20 वष॔ पासून विद्यार्थी घडवित आलेला आहे. त्या कुंभाराला त्याचा मोबदला मिळतो.पन येथे मात्र दमडीही मिळत नाही. आणी आदश॔ नागरीक घडविण्यासाठी त्याला जिवनातले 25 वष॔ शिक्षणात दयावे लागतात .शाळेवर विद्यार्थ्यांना पवित्र  ज्ञानदानाचे काय॔ करणायासाठी 5 वष॔ पैशाची तळजोळ करायला लागतात आणि 20 वष॔ पगार मिळविण्यासाठी लागतात म्हणजे जिवनातले 50 वष॔ दिल्या जातात  आणि येवढेच नाही तर आंदोलने आमरण उपोषण लाठीचाज॔ अपमान, 14 वष॔ कायम शबद काढणयासाठी 4 वष॔  शाळा घोषीत होण्यासाठी 1 वष॔ 100%ची अट शिथीलसाठी काही महीने GR  काढण्यासाठी आणि पगारासाठी माहीत नाही मात्र निवृत्ती चे वष॔ माहीत आहे.   पूवी समाजामध्ये शिक्षकना खूप मान- सन्मान मिळायचा परंतू आज तेवढा मान सन्मान राहिला नाही.आम्ही जे विद्यार्थी घडविले ते आज कोरोना महामारी साठी देशाची सेवा करत आहेत डाँकटर, नस॔,पोलीस देशाचे संरक्षण  करणारा जवान लोकांचे जिव वाचवत आहेत. ही खरी संपती कमावली .परंतु दु:ख येवढेच आहे आम्हाला हक्काचा पगार मिळत नाही. आम्हाला भिक नको फक्त हक्काचा पगार पाहीजे. कडू पन सत्य चूकल असेल तर क्षमा मागतो.
धन्यवाद...
आपलाच विनाअनुदानित बांधव

No comments:

Post a Comment